चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर माध्यमिक विद्यालय, साखर येथे योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव यांनी ‘ योग प्रशिक्षक ‘ सरस्वती नंदवंशी मॅडम यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे जीवनातील महत्त्व विशद केले.
योग प्रशिक्षक सरस्वती नंदवंशी यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिकामध्ये ओम, योग प्रार्थना, बेसिक हालचाली, पाच ज्ञानेंद्रियेचे पोषणासन, प्राणायाम, बैठे व उभे आसन, कपालभारती, भ्रामरी, शवासन, वृक्षासन, गरुडासन यांचे प्रात्यक्षिक घेऊन व विविध प्रकारची माहिती देऊन मार्गदर्शन केले. शेवटी रवींद्र गावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











