राजापूर शहरात रानतळे परिसरात आग लागून गवत खाक

राजापूर (वार्ताहर): शहरातील रानतळे परिसरात मोकळया माळरानावर दुपारी ०२:३० वाजण्याच्या दरम्यान आकस्मिक आग लागून परिसरातील गवत जळून खाक झाले. मात्र याबाबतची माहिती मिळताच नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आग आटोक्यात आली.

रानतळे परिसरात आग लागल्याची माहिती नगर परिषदेला दुरध्वनीवरून प्राप्त झाल्यावर मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला तात्काळ पाचारण केले. त्यानंतर या भागात लागलेली आग आटोक्यात आली.
आगीमुळे परिसरात धुराचे लोट जमा झाल्याने परिसरातील नागरिकर भयभीत झाले होते. मात्र ही आग वेळीच आटोक्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.