नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थाचा सुळसुळाट झाल्यापासून नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन चिपळूण सिटीजन मुव्हमेंटची स्थापना केली व त्या माध्यमातून जनजागृतीस प्रारंभ केला.चिपळूण सिटीजनस मुव्हमेंट आणि चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या महारॅलीचे नियोजन दि. १६ जानेवारी रोजी करण्यात आले होते. चिपळूण सिटीजन मुव्हमेंट तर्फे गेले दोन महिने अमली पदार्थ विरोध मोहीम राबवण्यात आली व त्याचाच भाग म्हणून जवळपास १७ शाळांमधून ७००० विद्यार्थ्यांना जनजागृती कार्यक्रमात अंतर्गत माहिती देण्यात आली व या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
चिपळूण शहरातून धवलमार्ट या ठिकाणाहून या रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर नगरपालिकेच्या येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आली. ड्रग्ज विरोधी महारॅलीत १७ शाळांमधील तब्बल अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध रित्या सहभागी झाले होते. बँड,लेझीम आदींच्या साथीने या रॅलीचे रूपांतर युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानामध्ये भव्य अशा सभेमध्ये झाले. यावेळी भव्य असे स्टेज उभारण्यात आले होते आणि स्टेजवर ड्रग्स विरोधी अमली पदार्थांच्या विरोधात संदेश देणारे मोठ्या स्वरूपातील फलक देखील लावण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार रमेश कदम, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लायनेस क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्ष अंजली कदम व पदाधिकारी, महाराष्ट्र स्कूलचे अध्यक्ष रऊफ वांगडे ,पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे, मुस्लिम समाज मंडळाचे यासीन दळवी, कोवॅसच्या सुमती जांभेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डीबीजे कॉलेज, मेरी माता स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल यांच्यामार्फत अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण वर्गाला सोडविण्यासाठी संदेश देणाऱ्या पथनाट्य, एकांकिका आणि विविध कलाकृती दाखविण्यात आल्या.मेरी माता स्कूलच्या बँड पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले बँड पथकाची सलामी व त्यानंतर कार्यक्रमाचे प्रारंभ झाला यावेळी डीबीजे एनएसएस व एनसीसी चे विद्यार्थी,युनायटेड स्कुल,गद्रे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, ख्रिस्त ज्योती स्कुल, एसपीएम हायस्कूल, मेरी माथा स्कुल, रिगल कॉलेज, अली पब्लिक स्कुल, कालुस्ते हायस्कूल, आनंदराव पवार कॉलेज,परांजपे मोतीवाले हायस्कूल, आर. सी. काळे हायस्कूल, गोवळकोट मदरसा, कालुस्ते मदरसा आदी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच मान्यवरांच्या भाषणातून अंमली पदार्थांचे शारीरीक, मानसिक कौटुंबिक तसेच सामाजिक होणारे दुष्परिणाम या संदर्भातही माहिती देण्यात आली. याला उपस्थितांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या महारॅलीसाठी चिपळूण नगरपरिषदचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, आमदार शेखर निकम, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, चिपळूण अर्बन बँक, मुस्लिम समाज मंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशन, अपरांत हॉस्पिटल तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी मोठे सहकार्य केले. या संपूर्ण रॅलीमध्ये चिपळूण पोलीस स्टेशनचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांसाठी पाणी, तसेच नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती. सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र व प्रशंसनीय पत्र देण्यात येणार आहेत. रॅलीच्या यशस्वीतेसाठी चिपळूण मुव्हमेंटचे पदाधिकारी सतीश कदम, शशिकांत मोदी, आदीती देशपांडे, आशिष खातू,रूही खेडेकर,रिहाना बिजले, रेहमत जबले,प्रणिता धामणस्कर,शमिना परकार, रईस अलवी, मंदार चिपळूणकर,रविना गुजर, स्वाती भोजने,सफा गोठे, अंजली कदम, सुमती जांभेकर, तृप्ती कदम,पद्मा ओली, रुखसार अलवी, प्रथमेश कापडी, लता भोजने, रामदास राणे,नाझीम अफवारे, यासीन दळवी, नसरीन खडस आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावना व सूत्रसंचालन सतीश कदम यांनी केले. एकूणच हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला व संपूर्ण कार्यक्रम हा ड्रग्स विरोधी मुद्द्यावर केंद्रित असल्याने यापुढेही चळवळ सुरू राहील असे चिपळूण सिटीजन मुव्हमेंटच्या वतीने जाहीर करण्यात आले.












