लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटातील दोन रस्ता कामांची भूमिपूजने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या हस्ते झाले.अजित यशवंतराव यांच्या प्रयत्नाने आणि विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर मंजूर झालेल्या भांबेडकोळेवाडी येथील पावणाई मंदिर ते दैतवाडी रस्ता डांबरीकरण करणे आणि शिवगणवाडी रस्ता मजबूतीकरण व खडीकरण करणे या कामांची भूमिपूजन अजित यशवंतराव यांच्या हस्ते झाले.
या याप्रसंगी तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, गावकर मधुकर दैत, चंद्रकांत दैत, सुनिल दैत, शशिकांत सावंत, फिरोजशेठ वाघू, गावकर महादेव धनावडे, टी.पी.मोरे, पंढरीनाथ धनावडे,संतोष धनावडे, पुनाजी धनावडे, नामदेव तावडे, संजय खाडे शाखाप्रमुख पांडूरंग धनावडे, पोलिस पाटील वसंत शिवगण, विनोद मोरे, रविंद्र शिंदे, ठेकेदार प्रसाद धनावडे तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.












