गोळवण ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे पालकांसाठी स्पर्धेचे आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श गाव योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर -शाळा’ तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून गोळवण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पालकांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वृचिका वामन लाड यांनी बनविलेल्या तांदळाच्या पिठाच्या केकला प्रथम, तर ज्योती विकास मसुरकर यांनी बनविलेल्या चिलमिल राईस कबाबला द्वितीय तसेच सुनीता सतीश गावडे यांनी बनविलेल्या इडली चटणीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. स्पर्धेचे उद्घाटन मालवणचे प्रभारी गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी, खोटले केंद्रप्रमुख ज्युनिस गावित, गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता चिरमुले, सदस्य साबाजी गावडे, माजी पंचायत समिती सदस्या सागरिका लाड, गोळवण प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप साळकर, प्रकाश चिरमुले, शाळा समिती अध्यक्ष विकास परब, मुख्याध्यापक संतोष पाताडे, शिक्षक संजय परुळेकर, नम्रता पावसकर, संजय जाधव, नंदादीप नाईक, उत्तम पाताडे, संतोष चव्हाण, बाळाराम परब, करुणा राणे, प्रसाद परब, माया नाईक आदी उपस्थित होते.
स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात स्नेहल परब, प्रज्ञा परब, ईशा परब, पूजा आगलावे, अनिशा कदम, स्नेहा नाईक, अस्मिता नाईक, रेश्मा गोळवणकर, निशा वरक, रिया भांडे, श्रेया चिंदरकर, रवीना परब, समीक्षा चिरमुले, सागरिका लाड, सानिका तेजम, रुपाली चिरमुले, दिव्या सावंत, मंगल सावंत आदींचा समावेश होता. माझी शाळा अभियानात गोळवण शाळा नं. १ ने सहभाग घेतला असून या उपक्रमांतर्गत या स्पर्धेसह मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले. पाककला स्पर्धेसाठी तांदळापासून बनविलेले पदार्थ हा मेनू देण्यात आला होता. परीक्षक म्हणून गटसाधन केंद्र मालवणच्या आरती कांबळी गौरी नार्वेकर यांनी काम पाहिले विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग ते राज्यस्तर असे स्पर्धेचे स्वरुप असून यात गोळवण शाळा नं. १ ने सहभाग घेतल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मानेंनी शाळेला शुभेच्छा देऊन प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आत्मज मोरे म्हणाले, गोळवण ग्रामपंचायत तालुक्यात आदर्शवत असून आपण येथे सेवेत रुजू झाल्यावर प्रथमच गोळवण ग्रामपंचायत व शाळेला भेट दिली. गोळवण ग्रा.पं. शाळा नं. १ ला सर्वतोपरी सहकार्य करून भविष्यात शाळा राज्यस्तरापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.












