शिरगाव ( वार्ताहर) देवगड तालुक्यातील चाफेड गाव हा अतिशय दुर्गम भागात वसलेला आहे. चाफेड गावठण येथील जि प प्राथ.शाळा चाफेड शाळेपर्यंत जाण्यासाठी साधी पायवाट होती.त्यामुळे शाळेत जाताना मुलांना खूपच अडचणीचे होत होते.या गावचे निवडणूक केंद्रही या प्रशालेत आहे.त्यामुळे मोठी गैरसोय होत होती.त्यामुळे येथील ग्रामस्थ एकत्र येऊन एकजुटीने लोकवर्गणी काढून श्रमदानातून कच्चा रस्ता केला आहे.
या रस्त्यासाठी लागणारी जमिनी संबंधित जमिनमालकांनी विनामूल्य देऊन सहकार्य केले आहे.
या रस्त्याचे खडीकरण व डाबंरीकरण व्हावे अशी येथील ग्रामस्थांनी मागणी आहे.
या श्रमदानात सरपंच किरण मेस्ञी, उपसरपंच महेश राणे ,माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, सचिन मोंडकर, उदय राणे, प्रविण राणे, अशोक घाडी, प्रदीप घाडी, दर्शना घाडी, प्रकाश मोंडकर, दिक्षिता घाडीगावकर, अनंत घाडीगावकर याच्यासह आदी ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, सरपंच किरण मेस्त्री यांनी उपस्थित ग्रामस्थांना खाऊ वाटप केले.












