लोटेमाळ येथे तरूणाची गळफासाने आत्महत्या

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील लोटेमाळ येथे चाळीमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली.  पंकजकुमार नितराम (सध्या रा. लोटेमाळ, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव आहे. खोलीतील पंख्याला नायलॉन कपड्याने गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.