गवाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र कोटकर यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गवाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र आकाराम कोटकर यांना सरपंच सेवा संघ या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.

सदर पुरस्काराचे वितरण रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे होणार आहे. रवींद्र कोटकर हे गेली आठ वर्षे पोलीस पाटील म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. याशिवाय शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या एकूणच कामकाजाची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर येथे संपन्न होणार आहे सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार पार पडणार आहे. या पुरस्कारा बद्दल रवींद्र कोटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.