सोमवारी शिक्षण मंत्र्यांसमवेत बैठक
दोडामार्ग |: सुहास देसाई : पुणे येथील संचालक कार्यालयावर सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आयोजित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या प्रतिनिधी समवेत तसेच शिक्षण संचालकांनी शिक्षकेतरांच्या प्रलंबित मागणी संदर्भात व त्या सोडवण्यासाठी चर्चा करण्याकरता सोमवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षकेतर महामंडळाचा मोर्चा व आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय तातडीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ पदाधिकारी तसेच सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची आंदोलनाची पुढील दिशा ठरण्यासंदर्भात ऑनलाईन मिटींग घेण्यात आली .यावेळी बऱ्याच जिल्ह्यातून आलेल्या सूचनेनुसार आणि झालेल्या सर्वंकष चर्चेनुसार सोमवार १२ फेब्रुवारी रोजी होणारा पुणे येथील शिक्षकेतर बांधवांचा मोर्चा तुर्त स्थगित करण्यात आलेला आहे.
सोमवार १२ रोजी शासनाच्या प्रतिनिधी समवेत तसेच शिक्षण संचालकांनी शिक्षकेतरांच्या प्रलंबित मागणी संदर्भात व त्या सोडवण्यासाठी चर्चा करण्याकरता बैठक आयोजित केली आहे. बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे राज्याचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले. पुणे येथे होणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची सर्व शिक्षकेतर बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन महामंडळाचे वतीने करण्यात आले आहे.











