रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या सडामिर्या गावातील एका समुद्रकिनारी मृतावस्थेतील व्हेल मासा आढळून आला आहे. या माशाचे शरीर कुजलेले असल्याने त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजून आलेले नाही.
सडामिर्या ते जाकीमिर्या दरम्यान असणार्या किनार्यावर हा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला. माशाच्या तोंडाच्या मागील भाग शेपटीपयर्र्त कुजलेल्या अवस्थेत आहे. या माशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झालेला आहे. वाहत तो समुद्रकिनार्यावर लागला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली. हा व्हेल मासा सुमारे 45 फुट लांबीचा आहे. या माशाचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही.












