महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्त शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी जि.शाखा रत्नागिरी या संघटनेची रत्नागिरी तालुका कार्यकारणीची एक मताने निवड करण्यात आली.नुतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष श्री.शंकर वरक सर,सरचिटणीस श्री.दिपक गुरव सर,उपाध्यक्ष श्री.प्रकाश डोंगरे सर,कार्याध्यक्ष सौ.प्राजक्ता सावंत मॅडम,कोषाध्यक्ष सौ.शैला खेर मॅडम,सदस्य सौ.स्वाती साखळकर मॅडम,श्री.इंद्रनिल नागवेकर,श्री.गोताड श्री शिगवण व श्री यशवंत चव्हाण यांची कार्यकारणीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त ‘शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर खानविलकर,संघटना सल्लागार श्री उदय शिंदे सर व श्री राजाराम सावंत सर यांनी उपस्थित सभागृहाला संघटनेच्या कामकाज व ध्येय धोरण याबद्ल माहिती दिली.यावेळी व्यासपिठावर श्री.अनंत नैकर सर ,श्री.सय्यद सर व श्री कदम सर हे पदाधिकारी उपस्थिती होते.राजापूर तालुक्यामध्ये सेवानिवृत्त झालेले परंतू रत्नागिरी तालुक्यात वास्तव्याला असणारे श्री.दत्तात्रय निंबरे सर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
यासभेमध्ये रजारोखीकरण,वेतनवाढ,१ जुलै काल्पनिक वेतन निश्चिती,सातवा वेतन आयोग,गटविमा,स्वग्राम बिल विलंब व मेडिकल बिल याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने सौ.नेहा खेर मॅडम,सौ.स्मिता ठाकूर मॅडम,सौ.उमा तेरेदेसाई मॅडम,सौ.डाफळे मॅडम,सौ.हातिसकर,सौ.लिमये,श्रीम.सुकडेव सौ.घुडे इत्यादी सभासदानी सेवानिवृत्ती नंतर
निर्माण झालेल्या समस्या व अडचणी बाबत मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे या संघटनेच्या कार्याबद्ल समाधान व्यक्त केले त्यानंतर सभागृहात उपस्थित पदाधिकारी व सभासदांचे श्री.सय्यद सर यानी आभार मानले व सभेची सांगता करण्यात आली.











