शिरगाव( वार्ताहर) जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आठवी ते दहावीच्या गटात चिञकला स्पर्धेत शिरगाव हायस्कूलची विद्यार्थ्यांनी प्रांजली विश्वास कदम हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
याबद्दल तिला ११ हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांनीस कलाशिक्षक विनोद चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
या तिच्या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्लॅ,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य एस.एन.अत्तार पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.











