वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी प्रणव बाबली वायगणकर याची निवड करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी तसे निवडीचे पत्र आज प्रणव वायगणकर यांना दिले आहे. वेंगुर्ले शहराध्यक्ष म्हणून सध्या प्रणव वायगणकर काम करत होते. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन तालुक्यात युवा मोर्चा ची ताकद वाढविण्यासाठी त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां कडून अभिनंदन होत आहे.











