दापोली | प्रतिनिधी : धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर दापोली येथील डाॅ.विनोद जोशी यांची नियुक्ती करण्यातआली आहे.
विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. सदर समितीवर जिल्ह्यातील मा. विधानसभा / विधानपरिषद सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती मंत्री (विधि व न्याय) यांच्या मान्यतेने करण्याची तरतुद करण्यात आली आहे.त्यानुसार रत्नागिरी जिल्हा समितीमध्ये दापोली येथील वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक म्हणून डाॅक्टर विनोद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.










