आगीमुळे नुकसान झालेल्या शेडची विशाल परब यांनी केली पाहणी 

 

तळवडेतील रेडकर कुटुंबियांची भेट दिला आधार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळवडेचे माजी सरपंच कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागून नुकसान झाले होते. या

घटनेची माहिती मिळताच युवा उद्योजक विशाल परब यांनी घटनास्थळी भेट देत त्यांना मानसिक आधार दिला.

तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशाल परब हे उपस्थित होते. यावेळी त्यांना सदर घटनेची माहिती समजली. त्यानंतर त्वरीत त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रसंगी त्यांनी रेडकर यांना आधार देत आपुलकीने विचारपूस केली. अशा घटनांमध्ये आपण समाजातील एक घटक या नात्याने त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या परीने केला, असे यावेळी विशाल परब म्हणाले.