खेड तहसील अग्निशमन यंत्रणा विनाच ! प्रशासकीय कागदपत्रांचा प्रश्न गंभीर

आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीही मार्ग नाही; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
खेड(प्रतिनिधी) राज्य सरकारचे महाराष्ट्र अग्रिशमन सेवा संचालनालय १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निसुरक्षा जागरूकता करणार आहे. सरकारने सन २००६ मध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक . व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम तयार केला असला, तरी खेड शहरातील महत्त्वाचे असलेल्या तहसीलदार कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अग्रिशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याची गंभीर खेड तहसीलदार कार्यालय इमारत.  निदर्शनास आली आहे.
या इमारतीचा वापर सन२०१९ पासून सुरू असून, अद्याप गंभीर बाबीकडे कोणाचे लक्ष कसे गेले नाही हा खरा प्रश्न आहे. येथे दररोज शेकडो लोक येत असून, तालुकावासीयांची महत्त्वाची दस्तावेजदेखील याच इमारतीत आहेत. त्यामुळे तातडीने येथे आग रोधक यंत्रणा बसवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खेड तहसील कार्यालयाचे कामकाज सन २०१९ मध्ये शहरातील नव्या इमारतीच्या जागेत उभारण्यात आले. या नवीन मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू होत असताना संबंधित ठेकेदाराने काही त्रुटी राहिल्या आहेत. परिणामी येथे कामासाठी येणारे अधिकारी कर्मचारी व नागरिक यांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. खेड तहसील कार्यालयाला कोणत्याही आपत्कालीन व्यवस्था नसल्याने आचर्य व्यक्त होत आहे
 निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी असलेली इमारत
सध्या लोकसभा निवडणुका कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक आयोग प्रत्येक मतदान केंद्र देखील पडताळून पाहते परंतु कोणतीही निवडणूक असो केंद्रस्थानी असलेली खेड तहसील कार्यालय इमारतीत अग्निशमन यंत्रणा नाही ही बाब एवढ्या वर्षात निदर्शनास कशी आली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे आवश्यक आहे.
परिस्थितीमध्ये बाहेर पडता येईल अशी व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी तर  आगी सारखा कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्याच्यावर प्राथमिक उपाययोजना तातडीने करता येईल यासाठी अमिशमनाचे कोणतेही साहित्य या इमारतीच्या तळमजल्यावर अथवा पहिल्या मजल्यावर दिसून येत नाही.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येण्यासाठी एक जिना असून, अन्य कोणतीही दुसरी व्यवस्था या ठिकाणी चढ उतार करण्यासाठी नाही, पहिल्या मजल्यावर प्रशासनाची तीन वेगवेगळी कार्यालय देखील असून, त्या ठिकाणीदेखील अग्रिशमनाची कोणतीही व्यवस्था नाही. यासंदर्भात पाच वर्षे उलटूनदेखील त्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर कामाच्या निवेदनामध्ये अग्निशमन यंत्रणा किंवा उद्वाहन यंत्रणा बसविण्यासाठी निधीची कोणतीही तरतूद नाही अशी माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे. ही बाब गंभीर असून शासनाचे महत्त्वाचे दस्तावेज असलेल्या तहसील कार्यालयामध्ये अग्रिशमन यंत्रणात नसणे ही बाब गंभीर आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाला ही यंत्रणा तत्काळ बसविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.