खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील गुणदे-देऊळवाडी येथील हनुमान मंदिरात १४ एप्रिल रोजी युवा वारकरी व भाविक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १४ रोजी पहाटे ५ ते ७ वाजता, रूद्राभिषेक, सकाळी ८ ते ९ वाजता घटस्थापना व भजन, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ वाजता महाप्रसाद, २.२० ते ३.२० सखाराम गोवळकर यांचे प्रवचन, दुपारी ३.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६ ते रात्री ९ भूषण अर्जुन महाराज मोटे यांचे कीर्तन झाल्यानंतर रात्री ९ वाजता महाप्रसाद होईल.










