महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या स्वामींच्या जयघोषाने हडपिडनगरी दुमदुमली
देवगड : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिन उत्सव श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी संचलित श्री स्वामी समर्थ हडपीड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सहास केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक भेट दिली. स्वामीं महाराजांचे आशीर्वाद घेतले.यात विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज वाढदिवस होता आणि सिंधुदुर्ग असल्याने या उत्सवात भेट देऊन समाधान व्यक्त केले मठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या उत्सवानिमित्ताने देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री.स्वामी समर्थ मठात श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळया निमित्त भाविक भक्तांची मांदियाळी पसरली पहायला मिळाली.देवगड कणकवली सह जिल्हाभरातील स्वामी भक्तांची हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठातील प्रकट दिन सोहळा व मठाच्या वर्धापन सोहळा उत्सवास भेट देत . स्वामींचे संत सत्व दर्शन घेतले..
सकाळी गणेश पूजन, स्वामींचे नित्य पूजन,पादुका पूजन, पाच संतसत्व दर्शन, श्री.सत्यनारायण महापूजा,पालखी मिरवणूक ,महाआरती, नामस्मरण, करण्यात आले. सुमारे चार ते पाच हजार भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उत्सवास केंद्रीय मंत्री नारायण राणे ,आमदार नितेश राणे ,सौ नीलम राणे, , यांनी या उत्सवास भेट दिली. मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.











