खेड(प्रतिनिधी)
खेड शहरातील पाण्याची टाकी ते डाकबंगला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्या मूळे वारंवार अपघात होत असून ते खड्डे तत्काळ भरण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास शेळके यांनी येथील न प मुख्याधिकऱ्या कडे निवेदना द्वारे केली आहे.
खेड शहरातील पाण्याची टाकी ते डाकबंगल्यामागे असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयापर्यंत असणाऱ्या प्रमुख रस्त्यावर एकूण १९ खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी पाण्याची लाईन घेताना रस्ता खोदलेला आहे. तो परत भरलेला नाही यामुळे नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सतत वर्दळीच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्डे मूळे अपघात घडत आहेत यामुळे पडलेले खड्डे डांबराने त्वरीत भरावेत अशी मागणी डॉ शेळके यांनी केली आहे









