खेड(प्रतिनिधी) शहर कचरामुक्त करण्यासह नागरिकाचे आरोग्यमान सदृढ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था अन् आदर्श संकुल स्पर्धा राबवण्याचा निर्णय येथील नगरपरिषदेने पतला आहे. गृहनिर्माण संस्थांसह सकुलाना सर्वोत्कृष्टचे मानांकन दिले जाणार आहे. वर्ष ४ टप्यात राबवण्यात येणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे सर्वाधिक गुण प्राप्त करणाच्या गृहनिर्माण संस्थासह संकुलांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे. खेड नगरपरिषद, तालुका पत्रकार संघ खेड लायन्स क्लब, खेड रोटरी क्लब खेड जेसीज क्लब पांच्या संयुक्त विद्यमाने घनकचन्याचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करून कचरामुक्त शहर निर्माण करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकामध्ये घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण याविषयी शाश्वत जनजागृती करून नागरिकांना ते अंगीकृत करण्यावर भर दिला जाणार आहे. पाकरिता व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
अस्वच्छता व किटकजन्य आजारासह विशेषतः डेंग्यूसाथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने घनकचऱ्याचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करून कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले जाणार आहे नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यावर या द्वारे भर दिला जाणार आहे. शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांसह संकुलांना या स्पर्धेत सामावून घेतले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान पासारख्या लोकोपयोगी योजनामध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचाही प्रयत्न केले जाणार आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसा याच्यासह न.प.तील सर्प अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका पत्रकार संघ, खेड लायन्स क्लब खेड रोटरी आणि नागरिकांच्या सहकार्याने वर्षभर चार टप्प्यात ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे. दर तीन महिन्यानंतर तपासणी पथकाद्वारे गृहनिर्माण संस्थासह संकुलांचे मूल्यांकन केले जाणार आहे. पहिल्या टप्यातही विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे. त्रैमासिक मूल्यांकनाद्वारे सरासरी काढून पहिल्या तीन विजेत्या गृहनिर्माण संस्था व संकुलांना गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत विजेत्या ठरलेल्या गृहनिर्माण संस्थासह संकुलांना २०२६ २७ या आर्थिक वर्षात मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाणार आहे. तसेच
सन्मानचिन्ह देवून यथोचित गौरव देखील केला जाणार आहे. १ मार्च २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ मा स्पर्धेचा कालावधी असणार आहे. मार्च से मे, जून ते ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर, डिसेंबर से फेब्रुवारी अशा चार टप्प्यात गृहनिर्माण संस्थासह संकुलाचे मूल्यांकन केले जाणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत कचरा वर्गीकरण, संकुल होम कंपोस्टींग, संकुल परिसर, परसबाग, वृक्ष लागवड आणि संगोपन, शून्य कचरा उपक्रम, हरित ऊर्जास्रोत पर्यावरण वस्तूंचा वापर डास उत्पत्ती प्रतिबंधक उपाययोजना, सामूहिक परिसर स्वच्छता सहभाग व जनजागृती मोहीम प्लास्टिक वापर बंदी, रेन वॉटर हार्वेस्टींग, मलशुद्धीकरण केंद्र आदी बाबीची तपासणी करून तपासणी पथकामार्फत मूल्यांकन केले जाणार आहे. याद्वारे घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य तऱ्हेने आणि नेटके व्यवस्थापन करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.










