शहनाई हॉल लांजा येथे होणार महायुतीची प्रचार सभा, मान्यवर नेत्यांची उपस्थिती
लांजा (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी २ मे रोजी लांजा येथील शहनाई हॉल या ठिकाणी सकाळी ११ वाजता महायुतीची प्रचार सभा होणार असून या सभेत केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे ‘हेविवेट’ उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीची जंगी प्रचार सभा ही २ मे रोजी सकाळी ११ वाजता शहनाई हॉल, लांजा या ठिकाणी होणार आहे.
या सभेला उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, शिवसेना नेते किरण सामंत, तसेच भाजपाचे लोकसभा संयोजक आणि माजी आमदार प्रमोद जठार, विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय या पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
या जंगी प्रचार सभेच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई त्याचप्रमाणे मनसे, आरपीआय या पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.












