कोकणच्या सर्वोच्च विकासासाठी ना. नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया….

 

1990 च्या उत्साहात सर्व कार्यकर्ते दादांच्या प्रचारात…

मालवण नगरीचे माजी उपनगरध्यक्ष सुहास हडकर यांनी 1990 च्या आठवणीना दिला उजाळा…

अमित खोत | मालवण : 1990 पासून आज पर्यंत आम्ही सर्व एकनिष्ठेने एक दिलाने आमचे दादा अर्थात राणे साहेबांसोबत आहोत. त्यावेळी एक नवचैतन्यरूपी धडाडीचे नेतृत्व जनतेच्या साथीने महाराष्ट्राला लाभले. या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्तृत्वाने देशपातळीवर आपली छाप पाडली. एक गिरणी कामगाराचा पुत्र ते महाराष्ट्राचे नेतृत्व समर्थपणे सांभाळताना कोकणवासीयांच्या आशा आकांक्षा केंद्रित करणारे, धडाकेबाज निर्णय घेणारे त्यावेळ पासून आमचे सोबती ‘दादा’ अर्थात ना. नारायण राणे होय..!

आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात दादांना खासदार म्हणून पाठवण्याची संधी आम्हा जनतेला लाभली आहे. दादा, आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही आपणास वचन देत आहोत. कोकणच्या सर्वोच्च विकासासाठी आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आमचे नातलग, मित्रमंडळी, सहवासात असलेले सर्व मतदार या सर्वांना नम्रतापूर्वक सांगत आहोत. समर्थशाली भारतासाठी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी तसेच कोकणच्या सर्वोच्च विकासासाठी आमच्या दादाना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया.

दादांच्या विकास कार्याची व्याप्ती मोठी आहे.. त्यांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व.. आदर्शवत आहे. त्यांच्याबद्दल बोलावे तितके कमी आहे. ते आले… त्यांनी पाहिलं… ते जिंकले… अगदी अकल्पितपणे हा उगवता तारा आमच्या प्राणप्रिय झाला.

1990 साली विधानसभा निवडणूक निमित्ताने दादा मालवणला आले आणि मालवणचे कोकणचे झाले. मालवण तालुक्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी, प्रत्येक घर त्यांनी आपलेसे केले. प्रत्येकाच्या सुखदुःखात भागीदार झाले. दुःखाची सावली पडलेल्या घरात आधाराची शिदोरी त्यानी दिली. ज्या घरात ते पोहोचले त्या कुटुंबाचे पालकते झाले. रक्षणकर्ते झाले. त्यावेळच्या निवडणूक काळातील आठवणी आज पुन्हा जाग्या होत आहेत. 1990 च्या उत्साहात त्यावेळचा प्रत्येकजण आणि सर्वजण मोठ्या उत्साहात प्रचारात सहभागी झाली आहेत.

त्यावेळी अनेक सहकारी दादांसोबत जोडले गेले. अशोक तोडणकर, आबा हडकर, शर्वरी पाटकर, सरोज परब, व्यापारी संघ माजी अध्यक्ष अंतोन मेंढीस, अशोक लोके, सुर्याकांत फणसेकर, शिवाजी परब, बबन रेडकर, अवी देसाई, राजन आंगणे, दाजी सावजी, अनिल निव्हेकर, तुळशीदास गावकर विजय चव्हाण, राजन परुळेकर, श्रीमती पावसकर यांसह अनेक नावे आहेत. यादी कमी पडेल. तसेच कै. शशी पै. कै. द्वारकानाथ तोडणकर कै. सहदेव गावकर यांचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

आम्ही समाजकारण करताना राजकारणात आलो. त्याचे श्रेय दादांनाच. एका कुटुंबापर्यंत परिवारापुरते मर्यादित असलेले आम्ही गाव, तालुका, जिल्हा पातळीवर पोहोचलो. राजकारण सच्चाईने करा, जनतेचे सेवक बना हा कानमंत्र दादांनी आम्हाला नेहमी दिला.

एक धडाडीचे नगरसेवक ते आम्ही महाराष्ट्राचे सर्वोच्च असे मुख्यमंत्रीपद भूषवताना तसेच केंद्रीय मंत्री म्हणून यशस्वी कार्यकाळ करत असताना आमच्या दादांना पाहणे हा आमचा स्वाभिमान आहे.

आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार म्हणून पाठवण्याची संधी आम्हाला लाभली आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात दादांना पाठवताना सर्वोच्च मताधिक्य मिळवून देऊया. असेही सुहास हडकर यांनी सांगितले.