जि. प. सदस्य सौ. रिद्धी सुतार यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
वैभववाडी l प्रतिनिधी :लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील नावळे व कुर्ली या खोरीतील गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज जि. प. सदस्य रिद्धी रितेश सुतार यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. या दोन गावांसाठी तात्काळ मोबाईल टॉवर मंजूर करण्याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिले.
लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात नावळे व कुर्ली ही दोन गावे येतात. खोरीतील या गावांमध्ये तातडीने मोबाईल सुविधा उपलब्ध करून द्यावी. रेंजअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय कामकाज तसेच दैनंदिन संवादावर परिणाम होत असल्याचे निवेदनात सौ. सुतार यांनी म्हटले आहे.
यावेळी लोरेचे सरपंच विलास नावळे, माजी सरपंच नाना रावराणे, रितेश सुतार तसेच सत्यजित रावराणे उपस्थित होते.
या मागणीवर पालकमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.












