रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

 

मंत्रालयामोरच्या राहत्या बिल्डिंगवरुन उडी मारून जीवन संपवलं

मुंबई: आयएएस अधिकारी दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली आहे. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आयएएस अधिकारी विकास आणि राधिक रस्तोगी हे आयएएस दाम्पत्य मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये राहतं. रस्तोगी दाम्पत्याच्या मुलीने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी काही काळ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते आणि त्यांच्या कामाबद्दल आजची चांगले बोलले जाते. काही काळ लिपी ही देखील लहान असताना रत्नागिरीत होती. त्यामुळे या घटनेने रत्नागिरीकारानाही धक्का बसला आहे.

नरिमन पॉईंट परिसरात रस्तोगी यांचे शासकीय निवासस्थान आहे. लिपी रस्तोगी या २६ वर्षीय युवतीने हिने या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारली. ती खाली कोसळल्याचे कळताच लिपीला उपचारासाठी तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. लिपी ही हरियाणातील सोनिपत येथे एल.एल.बी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. मात्र, शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्याने ती चिंतेत होती. तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.