एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलतर्फे मा. खा. नारायणराव राणे यांचा सत्कार

 

 

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य संस्थापक माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मान. श्री. नारायणराव राणे यांचा मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गातर्फे शाल व श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन कॉलेजचे डीन डॉ. सुदर्शन रेड्डी यांनी सत्कार केला. त्यावेळी त्यांच्या सोबत संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलम ताई राणे या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत हॉस्पिटलचे सी. ए. ओ. डॉ. अजित लांब, तसेच डॉ. आर. एस. कुलकर्णी व एस.एस.पी.एम.चे ट्रस्टी डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता आणि या सर्वांनी मान. खा. नारायणराव राणे साहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.