न्हावेली । प्रतिनिधी : वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात गुळदुवे जोशीवाडी येथील दिनकर विठ्ठल जोशी यांच्या मालकीच्या इको गाडीवर( जीए ०८ – एम – २६७०) जांभळाचे भले मोठे झाड कोसळले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात गाडीचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच गुळदुवे गावचे सरपंच शैलेंद्र जोशी, पोलीस पाटील केरकर, तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाकडून जोशी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.












