रत्नागिरी | प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हा जोर पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता हवामान वेधशाळे कडून व्यक्त करण्यात येत आहेत.
येत्या पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज व्यक्त करताना पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग सह रत्नागिरी मध्ये पावसाच्या सरी कोसळतील.जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामध्ये 30 जून, 1 जुलै आणि 2 जुलै या कालावधीत अति ते अति मुसळधार पावसाच्या सरी काही ठिकाणी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर 3 जुलैला सुद्धा पावसाचा हा जोर कायम राहील असेही सांगण्यात येत आहे.
पावसाचा जोर वाढल्यामुळे आता सगळीकडेच शेतीच्या कामाला जोर आला असून कोकणामध्ये छोट्या छोट्या भात शेताच्या दळ्यांमध्ये आता पेरणीच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली दिसून येत आहे.












