बांदा : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडली बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी बांदा ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यात पात्र महिलांना सदर योजनेचे फॉर्म भरणे, सर्व माहिती भरून फॉर्म अपलोड करणे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच सदर योजनेचे फॉर्म ग्रामपंचायत तर्फे पूर्णपणे मोफत देण्यात येतील. तरी ग्रामपंचायत हद्दीतील पात्र महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.










