लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था
सावंतवाडी :
महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी नगर परिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोमवार दि. ८ जुलै पासून सावंतवाडी शहरातील महिला सदर केंद्रावर अर्ज सादर करू शकतात. तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता सावंतवाडी शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री.सागर साळुंखे यांनी केले आहे.










