ओरोस येतील पूरग्रस्तांना भाजप नेते निलेश राणे यांनी दिली तात्काळ भेट

 

सिंधुनगरी प्रतिनिधी

जिल्ह्यातील मुसळधार अतिवृष्टी सुरूच असून सिंधुनगरी ओरोस येतील ख्रिश्चन वाडी मधील जवळपास १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी या ठिकाणी भेट देत नागरिकांना धीर दिला आहे. या सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल व राजधानी हॉटेलच्या रूम्स मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या सर्व पूर परिस्थितीबाबत सर्व यंत्रणांना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांनीही पूर परिस्थितीत भेट दिली असून मदत कार्यात सहभाग घेतला होता. महामार्गावर वसलेली या वाडी मधील सर्व कुटुंबे पूर परिस्थितीमुळे घरात पाणी शिरून बाधित झाली आहेत. 50 नागरिकांना पोरस येतील डॉन बॉस्को शाळेमध्ये 50 नागरिकांना लगतच असलेल्या राजधानी हॉटेलच्या एका इमारतीत तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
येथील पूर परिस्थितीची माहिती मिळतात निलेश राणे हे तातडीने ओरोस येथे दाखल झाले व त्याने बाधित नागरिकांची भेट घेत धीर दिला. त्याने रोख रकमेसह जेवणाची ही व्यवस्था केले