वाहतूक बंद; काही ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले
रत्नागिरी । प्रतिनिधी
आज पहाटे 10जुलै 24रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्या मध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.यामुळे मुंबई तून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्स चे मार्ग बदलण्यात येत आहेत. अशी माहिती सचिन देसाई,
जनसंपर्क अधिकारी,कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांनी दिली आहे.
रद्द करण्यात आलेल्या ट्रेन मधे
वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी पॅसेंजर, तेजस एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत तर मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल- लोणावळा – पुणे -मिरज- लोंढा -मडगाव असा करण्यात आला आहे.











