लायन्स क्लब सेवाकार्याचे व्रत!

 

ऍड. विजय जमदग्नी यांचे प्रतिपादन : लायन्स क्लब मालवण नूतन अध्यक्ष महेश अंधारी व कार्यकरणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मध्ये आलेले सदस्य हे सेवा भावी वृत्तीने एकत्र आलेले असतात. सेवा कार्याचे हे व्रत सर्वांनी पुढे नेऊया, सदस्यांनी लायन्स क्लबला गुरुस्थानी मानून सेवा कार्य करावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे ग्लोबल सर्व्हिस जिल्हा समन्वयक ऍड. विजय जमदग्नी यांनी येथे बोलताना केले.

 

 

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सन २०२४- २५ या वर्षासाठी निवडलेल्या नवीन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दैवज्ञ भवन मालवण येथे लायन्स क्लबचे ग्लोबल सर्व्हिस जिल्हा समन्वयक ऍड. विजय जमदग्नी, झोन चेअरमन विश्वास गांवकर, रिजन चेअरमन गजानन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

 

 

यावेळी ऍड. विजय जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव उमेश शिरोडकर, खजिनदार सचिन शारबीद्रे यांच्याकडून नूतन अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, सचिव सौ. फॅनी फर्नांडिस, खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आले. तसेच नूतन कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी व सदस्य यांनाही पदभार व शपथ देण्यात आली. तसेच क्लबमध्ये नव्याने दाखल झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

 

 

विश्वास गावकर यांची झोन चेअरमनपदी बढती झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर रिजन चेअरमन गजानन नाईक उपस्थित होते.

यावेळी लायन्स सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच क्लब मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लायन्स सदस्यांना सन्मानित करण्यात आले.

 

 

यावेळी विश्वास गावकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष महेश अंधारी यांनी क्लबने आपल्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी दिली असून त्यासाठी आपण आभारी आहोत, आपल्या कार्यातून लायन्स क्लबचे नाव मोठे होण्यासाठी प्रयत्नशील राहणार, असे सांगितले. यावेळी फॅनी फर्नांडिस, पल्लवी खानोलकर यांनीही विचार मांडत दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असे सांगितले. यावेळी गजानन नाईक, माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर, ऍड. अजित भणगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सौ. स्नेहा जामसंडेकर व गणेश प्रभूलकर यांनी केले. आभार सौ. वैशाली शंकरदास यांनी मानले.

 

 

 

यावेळी डॉ. शशिकांत झाट्ये, उमेश नेरुरकर, नाना साईल, दत्ताराम रेवणकर, मोहन पटेल, अवधुत चव्हाण, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, मुकेश बांवकर, अरविंद सराफ, उदय घाटवळ, विराज आचरेकर, परशुराज पाटकर, दीपक पाटकर, महेश कांदळगावकर, जॉन नरोना, महेश कारेकर, राजा शंकरदास, रविकिरण तोरसकर, राधिका मोंडकर, मिताली मोंडकर, दिक्षा गावकर, मनीषा गावकर, स्वप्नाली नेरुरकर, जयश्री हडकर, अंजली आचरेकर, मीना घुर्ये, डॉ. प्रिया रिवणकर, सहदेव बापर्डेकर, डॉ. हरीश परुळेकर, मेघश्याम शंकरदास, शाम नार्वेकर, डॉ. दर्शन खानोलकर, श्वेता यादव, रूपा कांदळगावकर आदी व इतर उपास्थित होते.