वाढलेला मतदान वैभव नाईक यांना मोठा धक्का देणार
मालवण | प्रतिनिधी : निलेश राणे यांचा विजय नक्कीच आगळा वेगळा असा असेल. वाढलेले मतदान वैभव नाईक यांच्या अपयशी कारभाराला धक्का देणार. निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित झाला. असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
दहा वर्षात वैभव नाईक यांनी काहीच केले नाही. उलट निलेश राणे गेली चार पाच वर्षे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करत होते. मोठा विकासनिधी त्यांनी आणला. महायुती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघर प्रचार केला. जोमाने काम केले. जनतेने उत्स्फूर्त मतदान केले. मतदान वाढले. हे वैभव नाईक यांना धक्का देणारे ठरणार आहे. त्यामुळे निलेश राणे यांचा विजय निश्चित झाला आहे.
खा. नारायण राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा मतदारसंघ निलेश राणे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार यात शंका नाही. असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.











