माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावरच धामापूर येथे गोवळ वाडी, निमरी जवळ पडलेले भले मोठे झाड सामाजिक कार्यकर्ते सुशील भायजे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करून रहदारीसाठीचा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.
शनिवार असल्याने सकाळची शाळा,त्यातच माखजन चा आठवडा बाजार यामूळे प्रवाशी वर्गासह वाहनांची सततची ये जा असते. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी पहाटे अचानक या मार्गावर भले मोठे झाड आडवे पडले.त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.त्यामुळे शाळेच्या विध्यार्थ्यांना माखजन किंवा करजुवे शाळेकडे येण्याचा
मार्ग बंद झाला.एसटी वाहतूक खोळंबली,वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे विध्यार्थी शाळे पासून वंचित राहतील अशीच स्थिती होती मात्र सामाजिक कार्यकर्ते सुशील भायजे यांना हि बातमी समजतात तात्काळ पहाटेच या ठिकाणी येऊन मार्गावर पडलेले झाड ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला केले. यामुळे सकाळची सात ची विध्यार्थ्यांना घेऊन जाणारी एस टी बस तसेच इतर खाजगी वाहने या मार्गावर सुरळीत पणे धावू लागली.या कामगिरी मुळे विध्यार्थी वर्गासह ग्रामस्थानी सुटकेचा निःश्वास टाकला या वेळी व सुशील भायजे व ग्रामस्थांचे प्रवासी व विद्यार्थ्यांनी आभार मानले या वेळी नाम्या गुरव ,मनीष भायजे, रवींद्र भायजे विलास महाडिक रमेश बेंडके, स्वागत महाडिक आधी ग्रामस्थ उपस्थित होते.











