लांजा नं. ५ शाळेतील मुलांनी घेतला तिथीभोजनाचा आनंद

लांज्यातील प्रतिष्ठित वकील समीर दळवी आणि बांधकाम व्यावसायिक राकेश घाग यांचे दातृत्व

लांजा (प्रतिनिधी) लांजा नं. ५ या शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी तिथीभोजनाचा आनंद घेतला. तिथीभोजनामध्ये भाजी, जिलेबी, खीर याचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे मुलांना एक वेगळा आनंद मिळाला. यासाठी वकील समीर दळवी आणि बांधकाम व्यावसायिक राकेश घाग यांनी तब्बल ४० किलो जिलेबी देऊन आपले दातृत्व दाखवून दिले.
‌शिक्षण सप्ताह “अंतर्गत शाळेमध्ये नुकताच हा कार्यक्रम पार पडला. शाळेतील तब्बल ५०० मुलांना तिथीभोजनाचा आस्वाद घ्यायला मिळाला.. या तिथीभोजनामध्ये भाजी, जिलेबी, खीर याचा समावेश करण्यात आला होता. यासाठी तब्बल ४० किलो जिलेबी ही प्रतिष्ठित वकील समीर दळवी आणि बांधकाम व्यावसायिक राकेश घाग यांनी देत आपले दातृत्व दाखवून दिले.सर्व मुलांनी भाजी, जिलेबी, खीर याचा मनोसक्त खाण्याचा आनंद घेतला.

 

 

समाजातील सर्वचं घटकातील मुले ही जि. प. च्या शाळेत शिकत असतात. अशा मुलांसाठी नेहमीच धावून येणारे, मदत करणारे तसेच शाळेच्या विकासासाठी नेहमीच योगदान देणारे शा. व्य. समिती सदस्य समीर दळवी तसेच बांधकाम व्यावसायिक राकेश घाग यांचं मोलाचं योगदान नेहमीच शाळेला मिळत असते.
दरम्यान,या तिथीभोजनाचा मुलांना लाभ मिळवून दिल्याबद्दल शा.व्य. समिती,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.