डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

 

 

मंडणगड l प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ, मंडणगड. या संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी संस्थेचे सरचिटणीस ऍड. विनोद भाई दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यगीत व ध्वजगीत विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केले. ध्वज प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविका सर्वानी ग्रहण केली .

या कार्यक्रमाचे संचलन क्रीडा शिक्षक श्री. संजय अवेरे ,श्री. मनोज चव्हाण यांनी केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याबद्दल भाषण व देशभक्तीपर नृत्य व गीते सादर केली.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रमेशजी दळवी, संस्थेचे सरचिटणीस ऍड.विनोदभाई दळवी, चिटणीस श्री.संतोष मांढरे,

संस्था सदस्य राकेश शिंदे प्रसाद हेंद्रे

श्री, पराग लेंडे,श्री. विनोद जाधव, श्री. प्रमोद काटकर सौ. मुग्धा दळवी, श्री. आशुतोष दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते . तसेच मुख्याध्यापक श्री.विजय खाडे, उपमुख्याध्यापक श्री.अर्जुन हूल्लोळी पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री.जयंतीलाल सुंदेशा व राजू गुजर यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी 50 किलो जिलेबी चे वाटप केले .तसेच इयत्ता दहावी अ मधील विद्यार्थी कुमार आर्यन सावंत यांनेही सर्व विद्यार्थ्यांसाठी चॉकलेटचे वाटप केले.

अशा प्रकारे स्वातंत्र्याचा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.