इन्सुली उपसरपंचपदी भाजपच्या वर्षा सावंत बिनविरोध

 

 

बांदा l प्रवीण परब :      इन्सुली गावच्या उपसरपंचपदी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या सदस्या सौ. वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली. इन्सुली ग्रामपंचायत सभागृहात उप सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. मात्र, यासाठी केवळ वर्षा सावंत यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविस्तार अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांनी सांगितले.

 

यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, कास सरपंच प्रवीण पंडित , निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत, माजी जि. प. सभापती गुरूनाथ पेडणेकर, माजी पं. स. सभापती मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्या नमिता नाईक, राधिका सावंत, स्वागत नाटेकर, दत्ता खडपकर, माजी सरपंच अश्विनी परब, नाना पेडणेकर, पूजा पेडणेकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, काका चराटकर, ज्ञानेश्वर राणे, आदी उपस्थित होते.

 

उपसरपंच कृष्णा सावंत यांनी पक्षीय धोरणनुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी आज बुधवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी नामनिर्देशन दाखल करताना सौ. वर्षा सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. अन्य उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली. वर्षा सावंत या डोबाशेळ, क्षेत्रफळ, कोठावळेबांध व माडभाकर प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणूक अधिकारी म्हणून ज्ञानदेव चव्हाण यांनी काम पाहिले.

 

इन्सुली गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करेन. गावातील महिलांसाठी रोजगाराभिमुख योजना कशा राबवता येईल याकडे लक्ष देईन. पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वाना एकत्र घेऊन गावच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवीन. गावातील रस्त्यांचा प्रश्न, वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचवेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच सौ. वर्षा सावंत यांनी दिली.

 

यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अजय कोठावळे, सचिन दळवी, राजन गावडे, नितीन राऊळ, महेंद्र सावंत, अजय सावंत, महेंद्र पालव, संजय पालव, उमेश पेडणेकर, महेश धुरी , औदुंबर पालव , दादा परब, स्वामी पेडणेकर, जयराम पालव, सुर्या पालव, रामा पालव, उमेश परब, मयुर परब, प्रदीप सावंत, अश्विनी परब, सुषमा पालव, प्रभाकर धुरी आदी सह इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.

———–