लांजा (प्रतिनिधी) लांजा पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक राहुल शितोळे यांची पदोन्नतीने बदली झाली असून याबद्दल त्यांच्या आज सोमवारी पुरवठा विभागाचे अधिकारी, तहसील विभागाचे अधिकारी आणि रेशन धान्य दुकान संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छापर सत्कार करण्यात आला .
राहुल शितोळे हे गेली पाच वर्षे लांजा पुरवठा निरीक्षक म्हणून काम करत होते. पुरवठा विभागाचे योजनाबद्ध काम हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात उत्तमरीत्या सुरू होते .तालुकातील रेशन धान्य दुकानांच्या देखील या कालावधीत वेळोवेळी तपासण्या करून आवश्यकता सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण कारभार हा गतिमान आणि योग्य पद्धतीने सुरू होता .
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची माणगाव रायगड येथे बदली झाली आहे. पुरवठा निरीक्षक पदावरून त्यांची पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे .आज त्यांना पुरवठा निरीक्षक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान आजवर गेल्या पाच वर्षात दिलेल्या एकूणच कामकाज आणि सहकार्याबद्दल लांजा तहसील तसेच महसूल विभाग आणि पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे लांजा तालुका रेशन धान्य दुकान संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










