आसगे जिल्हा परिषद गटातील कणगवली शिंदेवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

 

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आसगे जिल्हा परिषद गटातील कणगवली शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये महिलावर्गाचा सहभाग मोठा होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावातील लोक मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत.‌ रत्न सिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश सुरु आहेत.तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. या कार्यक्रमावेळी शिवसेना लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उप तालुका प्रमुख सुजित आंबेकर, तालुका सचिव वसंत घडशी, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. मानसी आंबेकर, तळवडे शाखा प्रमुख वैभव पाटोळे, बूथ प्रमुखा आणि तळवडे उपसरपंच प्रसाद उपशाखा प्रमुख अजहर पावसकर, गाव शाखा संघटक अनिल पांडुरंग शिंदे, अनिल शिंदे, सुहास मांडवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. गावाच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांना जास्तीत जात मताधिक्य आमच्या गावातून मिळवून देऊ असा निर्धार या सर्व ग्रामस्थांनी यावेळी केला.