तर सचिव साईनाथ लाडगांवकर, खजिनदार चेतन कदम, स्थानिक सचिव राजेंद्र साटम यांची बिनविरोध निवड
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी- सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाच्या अध्यक्षपदी अमित रावले यांची फेरनिवड, तर सचिवपदी साईनाथ लाडगांवकर, खजिनदार चेतन कदम, व स्थानिक सचिवपदी राजेंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुखशांती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार ११ सप्टेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष अमित रावले यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आली.यावेळी मंडळाचे नुतन पदाधिकारी म्हणून अध्यक्ष अमित रावले,सचिव साईनाथ लाडगांवकर, खजिनदार चेतन कदम, स्थानिक सचिव राजेंद्र साटम, तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून सुजय कदम, समिर रावले,स्वप्निल गावकर, प्रविण रावले,विशाल रावले,तेजस सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नुतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिव साईनाथ लाडगांवकर यांनी,आम्ही बोलून दाखविण्यापेक्षा विकास कामे व उपक्रम राबविणार आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला.











