आमदार नितेश राणे यांनी देवगड तारामुंब्री येथील खवळे महागणपतीचे दर्शन घेतले. या ठिकाणी आयोजित केलेल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ केला.
खवळे महागणपतीचे ट्रस्टी सत्यवान खवळे यांनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. शाल व गणपतीचा प्रसाद देऊन सत्कारही केला. नितेश राणे पुन्हा आमदार होवोत अशी प्रार्थना त्यांनी खवळे महागणपतीकडे केली.











