खेड नगर परिषदेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

 

खेड (प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेच्यावतीने २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या सफाई मित्र सुरक्षा शिबीर अंतर्गत सर्व सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी घेण्यात आली.

केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ही मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहे. या निर्णयाची नगर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत, शहर समन्वयक मुक्ताई तिर्थकर उपस्थित होते.