साईश्री,वेदश्री प्रस्तुत ‘नाट्यअभंग’ कार्यक्रम शनिवारी

Saishri, Vedashri presented ‘Natyabhang’ program on Saturday

प्रसिद्ध अभिनेत्री सौ.सुकन्या कुलकर्णी यांची उपस्थिती

रत्नागिरी: साईश्री आणि वेदश्री प्रस्तुत,नाट्यअभंग हा कार्यक्रम शनिवार दि. ६ मे २०२३ रोजी वी. दा. सावरकर, नाट्यगÉह, रत्नागिरी, येथे सादर केला जाणार आहे. साईश्री आणि वेदश्री या दोन्ही नÉत्य संस्था गेली २५ वर्ष रत्नागिरीमध्ये अनुक्रमे भरतनाट्यम व कथकचे क्लास घेतात.विविध महोत्सव तसेच विविध कार्यक्रमांमध्ये उत्तमोत्तम सादरीकरण या संस्थानी केलेले आहे.स्वत:च्या संस्थेचे देखील विविध कार्यक्रम दरवर्षी सादर केले आणि ते गाजले देखील. या कार्यक्रमासाठी सिने ‚नाट्य अभिनेत्री सौ.सुकन्या कुलकर्णी ‚मोने यांची उपस्थिती लाभणार आहे.
रत्नागिरी मध्ये सर्वाधिक गाजलेला कार्यक्रम म्हणजे प्रयास १००प्लस,यामध्ये १३० मुलींचा सहभाग होता.६० बाय ४० च्या मोठ्या स्टेजवर कथक आणि भरतनाट्यम चा सुंदर नÉत्यविष्कार सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला सावनी रविंद्र या प्रसिद्ध गायिका, तसेच शर्वरी जमेनीस या प्रसिद्ध अभिनेत्री व कथक नÉत्यांगना यांनी सादरीकरण केले.त्यानंतर कृष्ण रंग हा देखील असाच कार्यक्रम गाजला.

साईश्री आणि वेदश्री, नवनवीन संकल्पना घेऊन आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण करत असतात. सलग आठ वर्ष त्यांनी शास्त्रीय नÉत्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून नटराज करंडक व शिवो हम या राज्यस्तरीय स्पर्धा भरवल्या. यावर्षी देखील नाट्यगीत आणि अभंग, या संगीतातील दोन वेगवेगU्या धाटणीच्या गीतांवर आधारित भरतनाट्यम व कथक चा नÉत्याविष्कार सादर करणार आहेत. भरतनाट्यम हीस्वतंत्र शैली आहे,ही दक्षिणात्य पद्धत असून यात कर्नाटक संगीताचा वापर केला जातो,तर कथक हे उत्तर प्रदेशिय असून यामध्ये हिंदुस्तानी संगीताचा वापर केला जातो.असे असून देखील या दोन्ही संगीतातील गीत प्रकारांवर आपापल्या नÉत्याविष्काराने प्रेक्षकांची नक्कीच मने जिंकून घेतली जातील.
दोघातील एकत्रितपणा,दोघातील सारखेपणा आणि दोघातील फरक याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा नÉत्याविष्कार म्हणजे रत्नागिरीकरांसाठी एक सुंदर पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमासाठी सिने ‚नाट्य अभिनेत्री सौ.सुकन्या कुलकर्णी ‚मोने यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमकरिता अत्यल्प प्रवेश शुल्क आहे, या प्रवेशिका दि. ६ मे रोजी नाट्यगÉहावर सकाUी ९ते १२ उपलब्ध असतील रत्नागिरी करांनी नेहमीप्रमाणेच यास उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन साईश्री वेदश्रीच्या संचालिका सौ. मिताली भिडे व सौ. रूपाली लिमये यांनी केले आहे.