M Academy’s Raghuveer Satoskar selected for MCA Under-19 Super League
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू रघूवीर सातोस्कर याची महाराष्ट्र राज्याच्या अर्थात एमसीएच्या १९ वर्षाखालील सुपरलीगसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करीत पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रघूवीर सातोस्कर याने एप्रिल महिन्यात झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या १९ वर्षांखालील इन्व्हिटेशन लीगमध्ये दोन अर्ध शतकांसह २७. १० च्या सरासरीने २७१ धावा केल्या होत्या. त्याच्या याच कामगीरीच्या जोरावर त्याची एमसीए संघात त्याला स्थान मिळाले आहे. १९ वर्षांखालील सूपर लीगमध्ये खेळण्यासाठी रघूवीर हा ३ मे रोजी पुणे येथे रवाना झाला. त्याच्या या स्पर्धेसाठी अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक तसेच खजिनदार अक्रम खान यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.












