भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर : खा. नारायण राणे यांच्या मागील काही वर्षातील कार्याचा मांडला लेखाजोगा
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत (PMEGP) मालवण कुडाळ विधानसभेमध्ये एकूण 513 युवकांना कर्ज पुरवठा करण्यात आला. 9 कोटी 23 लाख एवढा कर्ज पुरवठा करून 1 कोटी 84 लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये छोट्या फिरते व्यावसायिकांना दहा हजार रुपयाचे बिनव्याजी एक वर्षाच्या मदतीचे कर्ज मंजूर केले होते. ज्या कर्जदारांनी हे पैसे मुदतीत भरले त्यांना दुसरा व तिसरा टप्पा असा वीस ते पन्नास हजार रुपये देण्यात आला. 37 लाख 75 हजार एवढा कर्ज पुरवठा 147 फिरते व्यापाऱ्यांना करण्यात आला.
खा. नारायण राणे जे करतात ते शाश्वत असते. भविष्याचा विचार करून असते. त्याच धर्तीवर निलेश राणे यांचे कार्य असून जनसामान्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याची धमक असलेल्या अश्या नेतृत्वाची कुडाळ मालवण मतदार संघाला गरज आहे. आता जनतेनेच निर्धार केला असून निलेश राणे यांचा विजय निश्चित केला आहे. असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी सांगितले.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात ते म्हणाले, मालवण कुडाळ मतदारसंघांमध्ये मध्यम, सूक्ष्म, लघु मंत्रालय विश्वकर्मा योजने अंतर्गत कुंभारकाम करण्यासाठी आवश्यक असणारी चक्री फिरकी 38 जणांना मोफत देण्यात आली. त्यामुळे कुंभार समाजाला आधुनिक तिची जोड देऊन व्यवसाय ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम करण्यात आले. मातीच्या वस्तू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तुलने नुसार बनु लागल्या आहेत. याचे प्रशिक्षण पण देण्यात आले होते. काही कुंभार व्यावसायिक रेल्वेमध्ये चहाला आवश्यक असणारे कुलट पुरवण्याचे काम पण करत आहेत. चर्मउद्योग करणाऱ्या 32 छोट्या व्यावसायिकांना मोफत लेदर टूल्स देण्यात आली. सुतार काम करणाऱ्या 18 व्यावसायिकांना छोटे लेथ मशीन देण्यात आले. 10 महिलांचा एकत्र ग्रुप करून अशा पाच ग्रुपना मोफत फूड प्रोसेसिंग युनिट देण्यात आले. त्याचप्रमाणे 12 महिला गटाना अगरबत्ती बनवण्याचे मशीन मोफत देण्यात आले. केलेली अगरबत्ती काही कंपन्यांना घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. खादी ग्राम उद्योग तर्फे सुत कातण्याचे मशीन दहा महिलांना देण्यात आले. माणगाव येथे दहा युवकांना एकत्र करून सावंतवाडी येथील प्रसिद्ध लाकडी खेळणी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी लेथ मशीन व हत्यारे देण्यात आली. अशा विविध प्रकारच्या योजना मालवण कुडाळ विधानसभेमध्ये राबवण्यात आल्या. बांबू पासून आर्ट अँड क्राफ्ट बनवण्याच्या क्लस्टर साठी मंजुरी देऊन अनुसूचित 500 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यांमध्ये होत असणाऱ्या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी माणगाव येथे फूड प्रोसेसिंग व फूड प्रोसेसिंग ला आवश्यक असणाऱ्या लॅब क्लस्टर मंजूर करून कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे. कॉयर बोर्ड मार्फत मालवण कुडाळ विधानसभेमध्ये 120 महिलांना प्रशिक्षण देऊन आवश्यक असणारी यंत्रसामुग्री अल्प दरामध्ये देण्यात आली. विविध प्रकारचे छोटे छोटे उद्योग कार्यान्वित करून मालवण कुडाळ मतदारसंघांमध्ये जवळजवळ दोन हजार युवक युवतीना रोजगार देण्याचे काम खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.
नारायण राणे यांच्या खासदार फंडातून मालवण कुडाळ मतदार संघामध्ये पहिल्या टप्प्यातील तीन कोटीची विकास कामे वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यान्वित झाल्या आहेत.
एखादा मोठा कारखाना आणून जेवढे रोजगार मिळू शकत नाही त्यापेक्षा जास्त तरुण उद्योजकांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी व मार्केट उपलब्ध करून देऊन उद्योजक कसा रोजगार उपलब्ध करू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांनी करून दाखवले आहे. निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघांमध्ये नेतृत्व करण्यास सुरुवात केली. आणि मागील दोन वर्षांमध्ये मालवण नगरपालिकेला नगरोध्यान निधी अंतर्गत नागरिक सुविधांसाठी16 कोटी 20 लाख रुपये एवढा भरीव निधी उपलब्ध करून दिला. मालवण शहर नळ पाणी योजना साठी 38 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 25 लाख मंजूर करून पहिल्या टप्प्यातील दहा लाख रुपये नगरपालिकेला उपलब्ध करून दिले आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण कुडा मतदारसंघांमध्ये भरीव निधी उपलब्ध करून दिला यामुळे बरेच रस्ते रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात आले.
मत्स्योद्योग मंत्री सुधीर भाऊ मुंडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मच्छीमारांचे डिझेलचे अनुदान अडकले होते ते अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. दांडेश्वर दांडी मंदिर ते मोरयाचा धोंडा नागरिकांच्या मागणी अनुसरून बंदरा कम रस्ता यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जल जीवन मिशन अंतर्गत मालवण तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीला शंभर कोटीच्या वरती निधी उपलब्ध करून दिला. मालवण चिंदर गावामध्ये असणाऱ्या तलावाला पर्यटन दृष्ट्या सुशोभीकरण करण्यासाठी सहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे नऊ दलावर असणारी कलादालनासाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊन कलादालन मंजूर करून देण्यास प्रयत्न केले.
छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त काढलेल्या विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या रॅलीला तसेच सावरकर यांची भव्य पदयात्रा अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त मालवण बंदर जेटी येते 25 हजार दिव्यांचा दीपमहोत्सव, महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धा, तसेच मालवण व्यापारी संघाचे मेळाव्याला नामांकित कलाकारांचा कार्यक्रम देऊन सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न निलेश राणे यांनी केलेले आपणास पाहावयास मिळतो
आमदार निरंजन डावखरे, आमदार श्रीकांत मात्रे यांच्या स्थानिक आमदार निधीतून मालवण कुडाळ मधील शैक्षणिक संस्थाना कॉम्प्युटर व आवश्यक असणारे प्रोजेक्ट उपलब्ध करून देण्यास यशस्वी झाले. दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वखर्चाने टॅब देऊन गौरवण्यात आले होते. कांदळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छप्पर खर्चाने दुरुस्त करून दिले. मालवण कुडाळ मधील गरजू रुग्णांना आर्थिक मदत करत असतानाच मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत करून देण्यात आले. ज्याप्रमाणे माननीय नारायण राणे साहेबांनी माझा मतदार संघ एक कुटुंब प्रमुख म्हणून सांभाळला होता तसाच कोणतेही पद नसताना मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारून सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न निलेश राणे यांनी केलेला आपल्याला निदर्शनात येतो. असेही भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी सांगितले.











