खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यात अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले असून तळे चिंचवाडी येथील
शेतकरी श्री. काशिराम धाकू दोडेकर यांची जर्शिगाय
अज्ञात रोगाने आजारी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे
गत वर्षी लपी सारख्या आजाराने अनेक शेतकऱ्याची जनावरे आजारी पडून मृत झाल्याच्या घटना घडल्या होत्या याच पार्श्वभूमीवर लपी रोग आहे की अन्य याची माहिती घेऊन योग्य त्या उपाय योजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न मोरे यांनी केली आहे











