रत्नागिरी : रत्नागिरी(दक्षिण)जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव पदी संदीप सुर्वे यांची निवड झाली आहे.
भाजपा दक्षिण रत्नगिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ही निवड सन २०२६ पर्यंत केली असून तसे पत्र त्यांनी संदीप सुर्वे यांना दिले. या निवडीबद्दल श्री. सुर्वे यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानून माझ्यावर पार्टीने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निस्वार्थी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.












