संगमेश्वरात थंडीचा कडाका वाढला

 

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असून,अनेक ठिकाणी नागरिक शेकोटीचा आसरा घेताना दिसत आहेत.
गडनदी,शास्त्री नदी,सोनवी नद्यांच्या लगत असलेल्या गावात तापमानात मोठी घट झालेली आढळून येत आहे.सलग वाढत असलेला थंडीचा कडाका असाच टाकल्यास आंबा ,काजूला चांगला मोहोर येण्यास मदत होणार आहे.
गेले दोन दिवस सायंकाळी ५ नंतर थंडीचा कडाका जाणवायला सुरवात झाली आहे.थंडी पासून संरक्षण होण्यासाठी अनेकजण शेकोटी करून थंडीची मजा देखील लुटत आहेत.