माखजन मराठी शाळेत रंगली वेशभूषा स्पर्धा

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन मराठी शाळेत नुकतीच वेशभूषा स्पर्धा रंगली.विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच अन्य कलांची आवड लागावी,थोडी मौज करता यावी, यासाठी वार्षिक शालेय उपक्रमाअंतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.

 

या स्पर्धेत लहान गटातून
प्रथम शार्वी शिंदे, (सावित्रीबाई फुले),द्वितीय नुपूर तांबे( जिजाऊ )
तृतीय उर्मी गांधी(टूथपेस्ट,ब्रश)तर
उत्तेजनार्थ आदित्य मोरे (झाड)आदींनी मिळवला.व मोठ्या गटात
प्रथम सृष्टी चव्हाण (सावित्रीबाई फुले) द्वितीय
सुहानी प्रजापती (डॉक्टर)
तृतीय आराध्या बने (वकील)
उत्तेजनार्थ पारितोषिक
हर्ष हेमण (श्रीकृष्ण)याला देण्यात आले.विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्षा वैष्णवी चव्हाण
मुख्याध्यापिका कल्पना नांदिवडेकर
पदवीधर शिक्षक रवींद्र घाणेकर
उपशिक्षक मितेश पळे, सुप्रिया जाधव आदींसह पालक उपस्थित होते.