ओटवणे (प्रतिनिधी ) कोनशी गावची ग्रामदेवता श्री देवी माऊली चा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवारी 2 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होत आहे.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.देवीला साकडे घालणे, नवस फेडणे ओटी भरणे आदी कार्यक्रमांसह रात्री सवाद्य पालखी मिरवणूक त्यानंतर माऊली दशावतार कोनशी मंडळाचा संयुक्त कलाकार यांच्या संचात स्कंदविजय अर्थात कार्तिकेय जन्म हा सयुक्त दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे तरी या जत्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कोनशी ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.












